आजरा महाविद्यालय, आजरा येथे 'क्रांती दिन' उत्साहात संपन्न; आधुनिक भारतासमोरील आव्हाने लीलया पेलण्याचे माजी सैनिक सुरेश देसाई यांचे आवाहन

आजरा महाविद्यालय, आजरा येथे 'क्रांती दिन' उत्साहात संपन्न; आधुनिक भारतासमोरील आव्हाने लीलया पेलण्याचे माजी सैनिक सुरेश देसाई यांचे आवाहन

आजरा महाविद्यालय, आजरा येथील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या वतीने ९ ऑगस्ट 'क्रांती दिनाचे औचित्य साधून‘ आज मोठ्या उत्साहात व देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने "आधुनिक भारतासमोरची आव्हाने आणि आजचा क्रांती दिन" या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून माजी सैनिक, सुबेदार, मा. श्री. सुरेश देसाई उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचा इतिहास उलगडून दाखवला. "आजच्या तरुण पिढीने केवळ इतिहास वाचून न थांबता, आधुनिक भारतासमोर असणारी सामाजिक, आर्थिक व सुरक्षेविषयक आव्हाने ओळखून ती लीलया पेलण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने आजच्या क्रांती दिनाची योग्य श्रद्धांजली ठरेल," असे प्रतिपादन सुबेदार देसाई यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. किरण पोतदार होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यात एन. सी. सी. ची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत उपस्थितांना क्रांती दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. दिलीप संकपाळ, परिवेक्षक श्री. मनोजकुमार पाटील तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन एन. सी. सी. ऑफिसर लेफ्टनंट डॉ. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या एन. सी. सी. कॅडेट्सने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने एन. सी. सी. कॅडेट्स व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कॅडेट. मार्टिन फर्नांडीस व आभार कॅडेट. नेहा गिलबिल यांनी मांडले.